पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – शासनाचे ५२ कोटी ६५ लाख रुपयांचे विक्रीकर थकवल्याप्रकरणी ‘बिग व्हिजन वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’च्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली येथे घडली.
चंद्रकांत महादेव मोरे आणि एका महिला आरोपी (दोघेही रा. पाटीलनगर, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. राज्यकर निरीक्षक सोमनाथ पोपट रणदिवे (वय ३७) यांनी मंगळवारी (दि. ५ मे) रोजी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ ते २०१८ या कालावधीत संबंधित व्यापाऱ्याने विवरणपत्रे भरली होती, परंतु २०१४ ते २०१७ या कालावधीच्या कर निर्धारणासाठी ते हजर राहिले नाहीत. वारंवार नोटीस बजावूनही त्यांनी ५२ कोटी ६५ लाख ८८ हजार ८९९ रुपयांची थकबाकी भरली नाही. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिळीमकर पुढील तपास करत आहेत.
कोट्यावधींचा विक्रीकर थकवणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हा दाखल
