pimpri chinchwad crime-इंस्टाग्राम स्टोरीवरून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad) – सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंटवर बदनामीकारक स्टोरी ठेवल्याचा जाब विचारल्याने एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना वाकडमधील माऊली चौक परिसरात मंगळवारी (दि.5 मे) रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली आहे.

दत्तात्रय उर्फ सोन्या रामेश्वर पांचाळ (वय 18, रा. थेरगाव), सुरज भुजबळ (वय 22, रा. वाकड) आणि दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दत्तात्रय याला अटक करण्यात आली आहे. संगिता आकाश जाधव (वय 49, रा. वाकड) यांनी बुधवारी (दि. 6 मे) रोजी यासंदर्भात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा उत्कर्ष जाधव याने आरोपीने इंस्टाग्रामवर ठेवलेल्या स्टोरीबाबत जाब विचारला होता. याचा राग धरून आरोपींनी संगनमत करून उत्कर्षला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर व पायावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. वाकड पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *