pimpri chinchwad-निगडी येथे महानगरपालिका फ क्षत्रिय कार्यालयात पार्किंग इमारती मध्ये अनधिकृत सेतू कार्यालय
निगडी येथील फ क्षेत्रिय कार्यालयातील पार्किंग इमारती मध्ये सेतू केंद्र उभारण्यात आले असून त्या संदर्भातील करारनामा संपुष्टात आला असून नवीन करारनामा न करता बेकायदेशीर सेतू केंद्र सुरू आहे.
त्या संदर्भातील कालावधीहि संपला आहे. फ क्षेत्रिय कार्यालय ह्या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय व फ क्षेत्रिय कार्यालय असून रोज हजारो नागरिक नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी ह्या ठिकाणी येत असून गाड्या पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही तर दुसरीकडे पार्किंग मध्ये बेकायदेशीर सेतू केंद्र उभारण्यात आले असून त्या संदर्भात अतिक्रमण कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
जेणेकरून नागरिकांना गाड्या पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध होईल.
या संदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, तसेच पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त यांच्या कडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता पिंपरी चिंचवड शहर.