पिंपरीत सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या महिलेवर कारवाई

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – पिंपरीतील सार्वजनिक रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून अश्लील हावभाव करणाऱ्या एका महिलेवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्‍या सुमारास कारवाई केली आहे.
​या प्रकरणी एका महिलेवर ‘अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस हवालदार उदयकुमार भोसले यांनी शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास आंबेडकर पुतळा चौक ते शगुन चौक दरम्यान असलेल्या सिटी प्लाझा लॉजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ही महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने अश्लील अंगविक्षेप करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग करत असल्याचे निदर्शनास आले. ​पिंपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *