पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – महाळुंगे येथील एका हॉटेलजवळील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या ‘मुंबई मटका’ नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी (दि. ११ मे) रोजी संध्याकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास सदगुरु हॉटेलजवळ करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र खेडकर यांनी सोमवारी (दि. ११ मे) रोजी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोपालसिंग सिद्धूसिंग गाँड (वय ४६, सध्या रा. महाळुंगे; मूळ रा. मध्यप्रदेश) आणि अशोक लोटन राय (वय ३६, सध्या रा. महाळुंगे; मूळ रा. मध्यप्रदेश) अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे मुंबई मटका नावाचा जुगार चालवून लोकांकडून पैसे घेत होते. छाप्यात पोलिसांना त्यांच्याकडे दोन हजार ६८० रुपये रोख आणि मटक्याचे साहित्य मिळून आले. आरोपींना भारतीय नागरी सुरक्षा संहितेनुसार नोटीस बजावण्यात आली असून, महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
महाळुंगे येथे मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
