गुंतवणुकीच्‍या नावाखाली बावधनमध्ये २८ लाखांचा गंडा

​पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – शेअर मार्केट किंवा इतर गुंतवणुकीवर ५ ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बावधन येथील एका नागरिकाची २८ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना १५ मार्च ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत ही घटना घडली.
​याप्रकरणी आरोपी टीना म्हलोत्रा आणि सानिका गोखले (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पुरुष फिर्यादीने मंगळवारी (दि. १२ मे) रोजी बावधन पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी आरोपींनी फिर्यादी यांना फोन केला. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना गुंतवणुकीवर ५ ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या सांगण्यावरून फिर्यादीने एकूण २८ लाख २६ हजार रुपये गुंतवले. मात्र, आरोपींनी मूळ रक्कम किंवा त्यावर मिळणारा नफा परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. बावधन पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *