पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा! पुण्याच्या तुलनेत शहरात उष्णता कमी बारामती ३८ अंशांवर, तर चिंचवड ३४.६ डिग्री

​पिंपरी-चिंचवड:
मे महिन्याचा अर्धा महिना उलटला असून पुण्यात सूर्याचा तडाखा वाढत असताना, पिंपरी-चिंचवडकरांना मात्र तापमानाबाबत काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (१५ मे) प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, पुण्याच्या विविध भागांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमधील तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या कमी नोंदवला गेला आहे.

​चिंचवडमध्ये ३४.६ अंश सेल्सिअस तापमान
​आजच्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात बारामती येथे सर्वाधिक ३८.३°C तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मगरपट्टा (३६.५°C) आणि शिवाजीनगर (३६.२°C) सारख्या भागांत उष्णतेची लाट जाणवत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड परिसरातील चिंचवड येथे तापमान ३४.६°C इतके मर्यादित राहिले आहे. पुण्यातील मुख्य भागांच्या तुलनेत चिंचवडमधील पारा जवळपास १.५ ते २ अंशांनी कमी असल्याने शहरवासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.

परिसरातील स्थिती काय?
​पिंपरी-चिंचवडच्या आजूबाजूच्या भागांचा विचार केल्यास तापमानात तफावत दिसून येते:
​तळेगाव: ३४.८°C
​डुडूळगाव: ३६°C
​हवेली: ३६.२°C
​लवळे: ३४.४°C

​आजचे जिल्हयातील टॉप ५ उष्ण भाग:
– बारामती: ३८.३°C
– मगरपट्टा: ३६.५°C
– आंबेगाव: ३६.३°C
– शिवाजीनगर / पाषाण / हवेली: ३६.२°C
– दौंड / दूडूळगाव: ३६.०°C

​उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन
​तापमान जरी ३४ ते ३५ अंशांच्या आसपास असले, तरी हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा जाणवू शकतो. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना पुरेसे पाणी पिणे, सुती कपड्यांचा वापर करणे आणि डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *