pimpri chinchwad-आळंदीत एकाच जमिनीची दोनदा विक्री करून ७० लाखांची फसवणूक

Business person holding a scam alert sign over a laptop, warning against online fraud.

​पिंपरी, दि. १६ (pimpri chinchwad crime) – खरेदीखत झालेले असतानाही तीच जमीन पुन्हा दुसऱ्याला विकून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार आळंदी येथे समोर आला आहे.

ही घटना ६ डिसेंबर २०२३ ते ७ मे २०२५ या कालावधीत आळंदी येथे घडली.

या प्रकरणी दत्तात्रय भरत खैरे (वय ४०, रा. वडगाव रोड, आळंदी) आणि इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका महिला फिर्यादीने याप्रकरणी शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी आळंदी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने जमीन गट क्रमांक ३४६ मधील ४० आर क्षेत्र ७० लाख रुपयांना आरोपीकडून रितसर खरेदीखत करून घेतले होते.

असे असतानाही, आरोपीने विश्वासघात करण्याच्या उद्देशाने तीच जमीन पुन्हा ८ मे २०२५ रोजी विक्री केली.

पूर्वीचे खरेदीखत व कुलमुखत्यारपत्र माहित असतानाही हा व्यवहार करून फिर्यादीची फसवणूक करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *