पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – एका तरुणाची स्कूटी अडवून त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि खिशातील रोकड जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. १६ मे) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चाकण येथील वाडेकर मिसळ हाऊससमोर घडली.
याप्रकरणी शुभम अनिल गोतारणे (वय २७, रा. आंबेडकरनगर, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी रविवारी (दि. १७ मे) उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोहन महेंद्र घोगरे (वय ३५, रा. बौद्ध नगर, चाकण, ता. खेड, जि. पुणे) आणि विवेक कुऱ्हाडे (वय २४, रा. बौद्ध नगर, चाकण, ता. खेड, जि. पुणे) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी स्कूटीवरून जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. विवेक याने फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि नाकावर पंच मारला, तर रोहन याने फिर्यादीच्या खिशातील पाच हजार ७०० रुपये जबरदस्तीने चोरून नेले. उत्तर चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
रस्त्यात अडवून तरुणाला लुटले
