प्राधिकरणात ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – पायी चालत जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना सोमवारी (दि. १८ मे) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निगडी प्राधिकरणातील सेक्टर २५ मधील जिग्गर व्यास यांच्या बंगल्यासमोर घडली.
या प्रकरणात एका ज्येष्ठ महिलेने सोमवारी (दि. १८ मे) रोजी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरील दोन अनोळखी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठ वाजताच्‍या सुमारास फिर्यादी महिला आपल्या पती आणि नातवासोबत रात्रीच्या वेळी पायी चालत जात होत्या. त्यावेळी समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण तिथे आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. या मंगळसूत्राची किंमत अंदाजे एक लाख २५ हजार रुपये आहे. सोनसाखळी हिसकावण्‍याच्‍या वाढत्‍या घटनांमुळे महिलांमध्‍ये भितीचे वातावरण आहे. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *