बिश्नोई गँगच्या नावाने फर्निचर व्यापाऱ्यावर यांच्या रावेत येथील गोळीबार प्रकरणी अराजू बिश्नोई याच्याशी संबंधित असणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि पथकाने उत्तराखंड येथून अटक केली आहे.
प्रवीण राम निवासे (वय २३, हरियाणा), पंकज कुलदीप रहाठी (वय २१, हरियाणा), सागर अजय पाल (वय २१, हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, रात्री उशिरा या तिघांना पुण्यात आणण्यात येणार आहे.
