शेअर्स आणि आयपीओ गुंतवणुकीच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूक

व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३५ लाख २८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ३० मार्च ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने माण, हिंजवडी येथील जॉयव्हिल शापुर्जी हाउसिंग प्रा. लि. कंपनी येथे घडली. या प्रकरणी एका व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, प्रतिमा बन्सल आणि मयांक सचान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादीला विविध व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट केले. त्यानंतर त्यांना एका ॲपवर केवायसी अपडेट करण्यास सांगून शेअर मार्केट व आयपीओमध्ये जास्त पैसे गुंतवल्यास मोठ्या फायद्याचे आमिष दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ३५ लाख २८ हजार रुपये भरण्यास भाग पाडले आणि ही रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *