भरधाव वेगात दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात १५ एप्रिल रोजी झाला असून २३ एप्रिल रोजी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घंटा नखाते वस्ती, रहाटणी येथे घडली.
शुभम पंढरीनाथ म्हस्के (१८, चिंचवडगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस शिपाई निलेश कदम यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच14/ केएक्स3955) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवत असताना त्याचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर त्याला १५ एप्रिल रोजी पिंपरी येथील वाय.सी.एम. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान २३ एप्रिल रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.
