​तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातून तडीपार करण्यात आलेला अट्टल गुन्हेगार धारदार कोयत्यासह फिरताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई रविरी (दि. २४ मे) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास निगडीतील संग्रामनगर झोपडपट्टी परिसरात करण्यात आली.
​आयुब चमन खान (वय २८, रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्किम, निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्‍हे शाखा युनिट क्रमांक एक मधील पोलीस हवालदार जयवंत राऊत यांनी रविवारी (दि. २४ मे) रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयुब खान याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तसेच शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही तो बेकायदेशीररीत्या शहरात फिरत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. झडतीदरम्यान त्याच्याकडून धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *