पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – पिंपरीतील गांधीनगर परिसरात पायी कामावर जाणाऱ्या तरुणाला अडवून डोक्यात धारदार वस्तूने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार शुक्रवारी (दि. २२ मे) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ताज बेकरीमागील गल्लीत घडला.
सौदागर हरिदास शिंदे (वय २०, रा. गांधीनगर, पिंपरी), राजेंद्र विटकर (रा. खराळवाडी, पिंपरी) आणि शिवड्या (पूर्ण नाव माहित नाही, रा. तेलगू गल्ली, पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मिलिंद शाहूराव चाबुकस्वार (वय २८, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी रविवारी (दि. २४ मे) रोजी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद हे पायी कामावर जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. “तू इथल्या पोरांसोबत का राहतोस?” अशी विचारणा करत आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर आरोपींनी मिलिंद यांना ढकलून अॅक्टिव्हावर पाडले. यातील एका आरोपीने धारदार वस्तूने त्यांच्या डोक्यात वार केला. यात मिलिंद गंभीर जखमी झाले. संत तुकारामनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पिंपरीत जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला
