पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – निष्काळजीपणे करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमध्ये एक मजूर जखमी झाला. पोलिसांनी याप्रकरणी साइटवरील कंत्राटदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रावेत येथील आस्टोरिया या बांधकाम साईटवर घडली.
शशिकांत राघवशरण श्रीवास्तव (वय ५५, रा. स्टार वूड्स सोसायटी, ताथवडे) आणि सचिन शंकर चव्हाण (वय २३, रा. कुरुळी, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई दशरथ बबन सदगीर यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी सुरक्षेची काळजी न घेता कंट्रोल ब्लास्टिंग केले आणि सर्व जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला की नाही हे न तपासता बबलू शेख या मजुराला पुन्हा ड्रील करायला लावले, ज्यामुळे स्फोट होऊन तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार करीत आहेत.
ड्रील करताना स्फोट होऊन मजूर गंभीर जखमी
