वर्धापन दिनानिमित्त गोल्डन रोटरीचा अभिनव उपक्रम.

रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे च्या (चार्टर डे) प्रथम वर्धापन दिनानिमित्त
“पर्यावरण युक्त – स्वच्छ सुंदर तळेगाव” या संकल्पनेतून तळेगाव दाभाडे शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणास युक्त व्हावे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद व श्री समर्थ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जिजामाता चौक येथे “प्लास्टिक बॉटल कलेक्शन केज” लोकार्पण समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.
रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.“स्वच्छतेसाठी एक पाऊल… पर्यावरणासाठी मोठा बदल!” या संदेशातून नागरिकांना प्लास्टिक योग्य ठिकाणी टाकण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून डिस्ट्रिक्ट 3131 ग्रीन सोसायटी डायरेक्टर रो केशव ताम्हणकर,विद्यमान नगरसेविका सौ. संगीताताई खळदे, सौ. सोनालीताई दरेकर, विद्यमान नगरसेवक श्री. विनोद उर्फ बंटी भेगडे, श्री. मदनजी नाटेकर, डिस्ट्रिक्ट टीम मेंबर रो किरण ओसवाल,माजी नगराध्यक्ष श्री. राजेंद्र पोळ, सामाजिक कार्यकर्ते श्री. नवनाथजी कुल तसेच मार्गदर्शक आण्णा दाभाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन रो महेश कुंभार यांनी केले. त्यांनी या अभिनव संकल्पनेमागील उद्देश स्पष्ट करताना नागरिकांनी प्लास्टिकमुक्त मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
रो संतोष परदेशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून “समाजासाठी काम करणं म्हणजे पुढच्या पिढीसाठी चांगला वारसा निर्माण करणं” असे सांगितले.डिस्ट्रिक्ट 3131 ग्रीन सोसायटी डायरेक्टर रो केशव ताम्हणकर यांनी रोटरीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी अभिनव “प्लास्टिक बॉटल कलेक्शन केज” संकल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल समर्थ इंजिनियर्स चे मॅनेजिंग डायरेक्टर रोटेरियन महेश कुंभार व उद्योजक विलास केमदारणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष,सर्व नगरसेवक तसेच नगरपरिषद कर्मचारी यांनी विशेष मोलाचे सहकार्य व योगदान दिले.
या कार्यक्रमास तळेगावातील सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच तळेगावातील नागरिक बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या पर्यावरणपूरक प्रकल्पाचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रो सौरभ मेहता,रो बसप्पा भंडारी,रो सुरेश बावबंधे,रो कविता खोल्लम,रो चेतन पाटवा व रो महेश कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लबचे सेक्रेटरी श्री. प्रदीप टेकवडे यांनी प्रभावी शैलीत केले.
कार्यक्रमाचे स्वागत रो किरण ओसवाल यांनी केले तर आभार प्रदर्शन रो प्रशांत ताए यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *