पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – आर्थिक फायद्यासाठी महिलेला आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई बुधवारी (दि. २७ मे) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हॉटेल स्काय इन लॉज, किवळे येथे करण्यात आली.
प्रेम विश्राम जैसवाल (वय ५०, रा. वेदांत पार्क, मुकाई चौक, किवळे, मूळ – ग्राम बढाईया, मध्य प्रदेश) याला अटक केली आहे. या प्रकरणी सुनील शिरसाट यांनी गुरुवारी (दि. २८ मे) रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी पीडित महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता. पोलिसांनी कारवाई दरम्यान ८ हजार ५३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी याच पैशातून स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
किवळे येथे लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
