दारू पिण्यास मज्जाव केल्याने महिलेवर तव्याने हल्ला

पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – दारू पिऊ नका असे सांगितल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने आपल्या नातेवाईक महिलेला मारहाण करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. २८ मे) रात्री १२:३० वाजेच्या सुमारास जयगणेश मंगल कार्यालयासमोर, किवळे रोड येथे घडली.
अनिल सुमंत माने (वय ५०, रा. कातळेवस्ती, किवळे) याला अटक केली आहे. या प्रकरणात अजय चिंचवडे (वय ४९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी गुरुवारी (दि. २८ मे) रोजी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची भाची पद्मिनी माने हिने आरोपीला दारू पिऊ नका असे म्हटले. याचा राग आल्याने आरोपीने तिला शिवीगाळ केली आणि लोखंडी तव्याने तिच्या डाव्या भुवईवर वार केला. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *