कंपनीच्या खात्यावर पैसे घेऊन, ट्रेनिंग देऊन आणि काम करून घेतल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी काढून टाकत तरुणांचा विश्वासघात करण्यात आला. ही घटना सप्टेंबर २०२५ ते १ जून २०२६ या कालावधीत गेरा इंपेरिअम राईज, हिंजवडी, फेज २ येथे घडली.
या प्रकरणात सौरव राजन नायर (२५, देहुरोड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीचे सीईओ हर्षल भानुदास ठाकरे, ट्रेनिंग अँण्ड डेव्हलपमेंट हेड ध्रुविल पारेख, एचआर सौम्या सिंग व थिनटेक टेक्नॉलॉजी प्रा.लि. या कंपनीतील इतर संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपापसात संगणमत करून फिर्यादी व इतर साक्षीदारांना ट्रेनी म्हणून ठेवले. त्यांच्याकडून काम करून घेतल्यानंतर प्रत्येकाकडून घेतलेले १५ हजार रुपये आणि दोन महिने केलेल्या कामाचा पगार अशी एकूण ११ लाख २५ हजार रुपयांची रक्कम न देता ती स्वतःसाठी वापरून त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
