वाहनांची तोडफोड करणाऱ्यास अडवल्याने तरुणाला मारहाण

भररस्त्यात दारूच्या नशेत दुचाकीची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने चिडून तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवार (२७ मे) रात्री ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास राजयोग पेट्रोल पंपाचे शेजारी, सावित्री बाई कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.

या प्रकरणात बालू सोनाजी इंगळे (२८, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश शरद मोरे (२६, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू इंगळे यांच्या भावाने त्यांची दुचाकी रस्त्यावर पार्क केली होती. आरोपी आकाश मोरे हा दारू पिऊन आला. त्याने दुचाकीची तोडफोड केली. बाळू यांनी त्याला विरोध केला असता आरोपीला त्याचा प्रचंड राग आला. आरोपीने बाळू यांना शिवीगाळ करत दांडक्याने बाळू यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. इतकेच नव्हे तर त्याने घरातील टीव्ही आणि कपाटाची काच फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *