पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. ३ जून) एकाच दिवशी २३ कारवाया केल्या. यामध्ये पोलिसांनी सुमारे दोन लाख रुपयांची दारू पकडली आहे.
सांगवी, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी, दापोडी, उत्तर महाळुंगे, पिंपरी, उत्तर चाकण, बावधन, भोसरी एमआयडीसी, वाकड, निगडी, संत तुकाराम नगर आणि चिंचवड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये बुधवारी (दि. ३ जून) रोजी २८ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी एक लाख ९७ हजार ४४६ रुपये किमतीची दारू पकडली आहे.
पिंपरी मधील भाटनगर परिसरात केलेल्या कारवाई मध्ये आरोपीने जिन्याखाली तसेच किचन मध्ये दारूसाठा लपवून ठेवला होता. तो दारूसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. तर चिंचवड मधील दळवीनगर झोपडपट्टी येथे कारवाईसाठी गेलेले पोलीस पाहून दारू विक्री करणारी महिला पोलिसांना पाहून पळून गेली. पळून गेलेल्या महिलेची ओळख पटवून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारू विक्री प्रकरणी पोलिसांच्या २३ कारवाया
