मावळमधील जाधववाडी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू; सुदुंबरे गावावर शोककळा ​वन्यजीव रक्षक संस्थेने काढला मृतदेह बाहेर; तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू

पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून एका ३५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (५ जून) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
​या प्रकरणात लक्ष्मण शरद ठोंबरे (वय ३५, रा. सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या दुर्घटनेबाबत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी जाधववाडी धरणाच्या पाण्यात एकजण बुडाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या टीमशी संपर्क साधला. माहिती मिळताच संस्थेचे जीवरक्षक सदस्य तातडीने धरणावर हजर झाले. त्यांनी तातडीने पाण्यात उतरून शोधमोहीम सुरू केली. काही वेळातच बुडालेल्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
​या घटनेचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *