प्रेमाला मिळणार कायद्याचे कवच!*
(Pune)-*पुण्यात आंतरजातीय-आंतरधर्मीय जोडप्यांसाठी सुरू झाले ‘सुरक्षागृह’*
फाटलेल्या समाजाला जोडत ज्यांनी जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन आपला जीवनसाथी निवडला आहे, अशा जोडप्यांच्या सुरक्षेसाठी आता पुणे जिल्हा प्रशासन खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहे. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या ज्या जोडप्यांना स्वतःच्या सुरक्षेची भीती वाटत आहे, त्यांच्यासाठी पुण्यात विशेष ‘सुरक्षागृह’ स्थापन करण्यात आले आहे.
*सुरक्षागृह कोठे आहे?*
शासकीय विश्रामगृह (जुने), २९ क्वीन्स गार्डन, ता. हवेली, जि. पुणे.
*अर्ज कोठे करायचा?*
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांच्या कार्यालयात.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. राधाकिसन देवढे यांनी जाहीर आवाहन केले आहे की, सुरक्षेची गरज असलेल्या जोडप्यांनी संकोच न बाळगता प्रशासनाशी संपर्क साधावा. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी अशा परिस्थितीत असेल, तर प्रशासनाच्या या सुविधेचा लाभ घेऊन स्वतःला सुरक्षित करा.
