पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – भोसरी येथील देवकर वस्ती परिसरात तलवार बाळगून फिरणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (दि. ७ जून) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलीस शिपाई वैभव पुरुषोत्तम वाटकर (वय २८), यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शुभम बाळु भंडारी (वय २५, रा. खराबवाडी, चाकण, पुणे) या आरोपी चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकर वस्ती येथील एका निर्जनस्थळी आरोपी संशयास्पदरीत्या फिरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५०० रुपये किमतीची एक लोखंडी तलवार आढळून आली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई असतानाही त्याने या आदेशाचा भंग केला. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.
तलवारीसह फिरणाऱ्या चालकाला अटक
