पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – वाकड परिसरातील एका तरुणाचे क्रेडिट कार्ड आणि यु.पी.आय (UPI) डिटेल्स वापरून सायबर चोरट्याने तब्बल तीन लाख १२ हजार ५२६ रुपयांचा गंडा घातला. ही घटना २ ते ५ जून दरम्यान घडली.
रणधीर अरविंद कुमार वर्मा (वय २८, रा. दत्त मंदिर जवळ, वाकड) यांनी सोमवारी (दि. ८ जून) रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमन (रा. फरीदाबाद, हरियाणा) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्डच्या गोपनीय माहितीचा गैरवापर करून ऑनलाइन पद्धतीने दोन महागडे मोबाइल फोन खरेदी केले. तसेच युपीआय आयडीचा वापर करून खात्यातून पैसे वळवून तीन लाख १२ हजार ५२६ रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
वाकडमधील तरुणाची तीन लाख रुपयांची फसवणूक
