Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
राज्य

नोकरी मिळेना, लग्न जमेना! नैराश्यातून बीडच्या ३२ वर्षीय तरुणाची भंडारा जवळ गळफास लावून आत्महत्या

By Team News Beez
June 12, 2026 2 Min Read
0

तळेगाव दाभाडे :
मनासारखी नोकरी मिळत नसल्याने आणि वय वाढत चालले तरी लग्न जमत नसल्याने आलेल्या तीव्र नैराश्यातून एका ३२ वर्षीय तरुणाने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदोरी (मावळ) येथील ऐतिहासिक व पवित्र अशा भंडारा डोंगर जवळील परिसरातही घटना घडली.
​परमेश्वर रामेश्वर कुरे (वय ३२, सध्या रा. देहू गाव, मूळ रा. आलापूर, ता. माजलगाव, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

​भंडारा डोंगर परिसरात खळबळ
​मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर कुरे हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील माजलगावचा रहिवासी होता, मात्र सध्या तो देहू गावात वास्तव्यास होता. इंदोरी मावळ येथील भंडारा डोंगर परिसरातील एका झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

​नातेवाईकांचा पोलिसांसमोर खुलासा; ‘ते’ दोन प्रश्न ठरले जीवघेणे
​या धक्कादायक घटनेबाबत तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी माहिती दिली. पोलिसांनी परमेश्वरच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आले. परमेश्वर हा सुशिक्षित होता, मात्र गेल्या काही काळापासून त्याला त्याच्या मनासारखी नोकरी मिळत नव्हती. त्यातच त्याचे लग्नही जमत नसल्याने तो मानसिक दडपणाखाली होता. या दोन्ही विवंचनेतून त्याला प्रचंड नैराश्य आले होते. त्याने आपल्या नातेवाईकांजवळ आत्महत्येचा विचार बोलून दाखवला होता. याच नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज नातेवाईकांनी पोलिसांशी बोलताना व्यक्त केला आहे.

​पोलीस तपास सुरू
घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

​तरुण मुलगा, त्यात रोजगाराचा आणि लग्नाचा प्रश्न, या सामाजिक आणि मानसिक विवंचनेतून बीडच्या एका तरुणाने पुण्यात येऊन आपले जीवन संपवल्याने त्याच्या मूळ गावासह देहू परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

रुग्णालय गाठण्याआधीच नवजीवनाची चाहूल; ‘१०८’ रुग्णवाहिकेत राज्यभरात ४२ हजारांहून अधिक सुरक्षित प्रसूती

Next

पिंपरी-चिंचवडकरांचे डोळे आकाशाकडे; जून अर्धा सरला तरी पावसाचा पत्ता नाही! उकाड्याने शहर होरपळले; शेतकरी, चाकरमानींसह रेनकोट-छत्री विक्रेतेही मान्सूनच्या प्रतीक्षेत

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme