दुचाकीवरून गांजाची तस्करी करणारी तरुणी पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – भोसरी येथील मच्छी मार्केट पीएमटी चौक परिसरात आपल्या दुचाकीवरून गांजाची विक्री व वाहतूक करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीला पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ११ जून) रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
​रसिका गोविंद जगताप (वय २१, रा. कलवड खांदवेनगर, विमाननगर, पुणे) हिच्यावर अंमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस हवालदार प्रतिभा गौरव मुळे यांनी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी तिच्या ताब्यातील दुचाकी (MH14 JY 6215) मधून सहा हजार ५०० रुपये किमतीचा १३० ग्रॅम गांजा अनाधिकाराने विक्रीसाठी घेऊन जात असताना रंगेहात पकडली गेली. पोलिसांनी दुचाकी व गांजा जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *