पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे येथील जुन्या पुणे-मुंबई हायवे रोडलगत सीआरपीएफ गेट नंबर ३ समोरील वडाच्या झाडाखाली सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १२ जून) रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
या प्रकरणी एका महिला आरोपीवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षतील सहायक पोलीस फौजदार सुनील जगन्नाथ शिरसाट (वय ४८) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला सार्वजनिक रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग करत असताना पोलिसांना मिळून आली. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.
वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या महिलेवर गुन्हा
