Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

पावसाळ्यात शहरात पाणी साचले तर अधिकाऱ्यांची खैर नाही! – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीं नदी व नालेपात्रातील अतिक्रमणांवर हातोडा मारण्याचे आदेश!

By Team News Beez
June 13, 2026 2 Min Read
0

​पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – आगामी पावसाळ्यात पिंपरी-चिंचवडकरांना पुराच्या पाण्यात अडकवून ठेवणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांना आणि नदी-नाल्यांचा गळा घोटणाऱ्या अतिक्रमणधारकांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी थेट इशारा दिला आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना, आयुक्तांनी शनिवारी स्वतः शहरातील विविध नाले आणि नदीपात्रांची प्रत्यक्ष पाहणी करून मान्सूनपूर्व कामांचा ‘ऑन द स्पॉट’ आढावा घेतला. “शहरात कुठेही पाणी साचले नाही पाहिजे आणि पूरस्थिती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे,” असे सक्त निर्देश देत आयुक्तांनी प्रशासकीय यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले.
​​आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह शिक्षक कॉलनी आणि पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्राची बारकाईने पाहणी केली. नदी आणि नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता किती आहे, याची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली. अतिवृष्टीच्या काळात ज्या सखल भागात पाणी साचण्याची किंवा पूर येण्याची दाट शक्यता असते, अशा संभाव्य ‘डेंजर झोन’ची यादी तयार करून तेथे २४ तासांत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
​शहरातील नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह रोखून त्यावर बेकायदेशीरपणे उभी राहिलेली अतिक्रमणे हेच पूरस्थितीचे मुख्य कारण ठरत आहे. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले. नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या अशा सर्व अतिक्रमणांवर कोणतीही दयामाया न दाखवता थेट आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
​यंत्रणांनी ‘एसी’ केबिन सोडून सतर्क राहावे!
​”पावसाळ्यात सामान्य नागरिकांना कोणताही मनस्ताप किंवा त्रास सहन करावा लागता कामा नये. महापालिकेच्या सर्व विभागांनी आपापसातील समन्वय वाढवून २४ तास सतर्क राहावे,” असे आवाहन आयुक्तांनी केले. नागरिकांची सुरक्षा हीच महापालिका प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
​महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात:
​आयुक्तांच्या या धडक पाहणी दौऱ्यात महापालिकेचे संपूर्ण वरिष्ठ प्रशासन रस्त्यावर उतरले होते. यामध्ये:
​अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजू साबळे, ​क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अजिंक्य येळे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, ​योगेश फल्ले, अंकुश झिटे, शांताराम माने यांच्यासह कार्यकारी अभियंता, सह अभियंता आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

महावितरणची दादागिरी! ‘४८ तासांत स्‍मार्ट मीटर बसवा नाहीतर… मीटर बदलण्याच्या संदेशावर प्रश्नचिन्ह; ‘सहमतीऐवजी सक्तीचा मार्ग का?’ असा नागरिकांचा सवाल

Next

भीमाशंकरचा ऐतिहासिक कायापालट; ‘हेरिटेज वाडी’मुळे जागतिक पर्यटन नकाशावर झळकणार पवित्र क्षेत्र

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme