नवी दिल्ली
रशिया-युक्रेन युद्धात मोठी घडामोड घडली असून वर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 1,000 हून अधिक ड्रोन तसेच क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रचंड हल्ल्यामुळे रशियातील अनेक महत्त्वाच्या तेल डेपो आणि ऊर्जा पायाभूत सुविधांना मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी भीषण आग लागल्याचेही वृत्त आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बहुतेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच निष्क्रिय करण्यात आली असली तरी काही लक्ष्यांवर हल्ला यशस्वी झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त होत असून युद्ध आणखी चिघळण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
या हल्ल्यामुळे रशिया-युक्रेन युद्धात नवीन आणि अधिक आक्रमक टप्पा सुरू झाल्याचे मानले जात असून ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले आगामी काळात जागतिक ऊर्जा बाजारावरही परिणाम करू शकतात.
