Delhi-ईपीएफ ठेवींवर ८.२५% व्याजदराला मंजुरी; ७ कोटींहून अधिक सदस्यांना लाभ

नवी दिल्ली(Delhi) : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील ८.२५ टक्के व्याजदराला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांना थेट आर्थिक लाभ मिळणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत येणाऱ्या ७ कोटींपेक्षा अधिक सदस्यांच्या खात्यांमध्ये या व्याजाची रक्कम लवकरच जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही प्रक्रिया याच महिन्यात पूर्ण होऊ शकते.

या व्याजदरामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती बचतीला अधिक स्थैर्य मिळणार असून, दीर्घकालीन बचतीसाठी EPF हा अजूनही एक सुरक्षित आणि महत्त्वाचा पर्याय असल्याचे मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *