मुंबई(Mumbai)- शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना जास्त पैसे खर्च होऊ नये म्हणून अटीशर्ती लावणारं सरकार खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना मात्र जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा- रोहित पवार
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कठोर अटी लावल्या जात असताना, दुसरीकडे “गद्दारी करणाऱ्यांना” जनतेच्या पैशातून Y+ दर्जाची सुरक्षा दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून केलेल्या या टीकेत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि महिला सुरक्षेसारखे महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. “गद्दारी करणाऱ्यांना संरक्षण देऊन पोसणारं आणि जनतेच्या प्रश्नांना वाऱ्यावर सोडणारं हे सरकार आहे,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
