मुंबई : राज्यात आगामी काळात मान्सून दाखल होण्याची शक्यता असून येत्या 21 ते 30 जून या कालावधीत महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस पेरणीयोग्य स्वरूपाचा असेल, असा दावा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केला आहे.
डख यांच्या अंदाजानुसार, या काळात राज्यातील बहुतांश भागात चांगला आणि उपयुक्त पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः शेतीसाठी आवश्यक असलेली जमीन ओलाव्याने भरून निघेल, ज्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीची कामे सुरू करण्यास मदत होईल.
दरम्यान, मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामानातील बदल आणि पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
