पुणे : पुण्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि अँटी नार्कोटिक्स सेल यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत धाड टाकली आहे. या कारवाईत ट्रामाडोलयुक्त औषधांची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून शहरात खळबळ उडाली आहे.
दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी मिळून केलेल्या या संयुक्त कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणी तपासणी करण्यात आली. यावेळी नियमबाह्य पद्धतीने औषधांचा साठा व विक्री होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ट्रामाडोल हे नियंत्रित औषध असून त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रशासनाने यावर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
