Pimpri-Chinchwad-काळेवाडीत पानमसाल्याचा साठा जप्त

पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – काळेवाडी परिसरातील एका पानटपरीवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी छापा टाकून मानवी जीवितास धोका निर्माण करणारा आणि शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १८ जून) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मामा पान शॉप, काळेवाडी येथे करण्यात आली.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन यांनी गुरुवारी (दि. १८ जून) रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहन गोरोबा चंदे (वय ३८, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहन चंदे याने आपल्या ताब्यातील मामा पान शॉप या टपरीमध्ये कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरपणे ६ हजार ६१८ रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याच्या उद्देशाने बाळगला होता. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *