देहूरोड मध्ये गावठी पिस्तूल बाळगणारा तरुण अटकेत

पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – गुन्हा करण्याच्या उद्देशाने किंवा परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी स्वतःजवळ विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका आरोपीला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (१८ जून) रात्री ८.२५ वाजण्याच्या सुमारास बुद्ध विहाराजवळ, रेल्वे ग्राउंडकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला करण्यात आली.
इम्रान रमजान रंगरेज (२८, देहूरोड) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब विधाते यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इम्रान हा रेल्वे ग्राउंडकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पद रित्या थांबला होता. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ५१ हजार रुपयांचा बेकायदेशीर शस्त्रसाठा मिळून आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *