तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा; २६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – पैशांवर बेकायदेशीरपणे तीन पत्ती नावाचा जुगार खेळणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. ही कारवाई दि. १९ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्‍या सुमारास दापोडी येथील जयभीमनगर भागातील एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोरील मोकळ्या जागेत करण्‍यात आली.
कृष्णा रामदुलार यादव (वय ३०), राकेश विजय जाधव (वय ३३), दीपक लक्ष्मण साळुंखे (वय ३१) आणि विशाल दिलीप ओव्हाळ (वय २७, सर्व रा. दापोडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई आकाश श्रावण सोनवणे (वय ३५), यांनी दापोडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोकड असा एकूण २६ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दापोडी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *