Nashik-मृगाची हुलकावणी, चिंतेने डोळ्यांत पाणी; कुंभमेळा विकासकामांनी जलाशय कोरडे, सर्वसामान्यांचे हाल; जबाबदार कोण?

नाशिक : राज्यात मृग नक्षत्र सुरू होऊनही अनेक भागांत पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी शेतीकामे खोळंबली असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनू लागला आहे.

दुसरीकडे, आगामी कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर जलस्रोतांचा वापर झाल्याचा आरोप होत आहे. अनेक तलाव, बंधारे आणि जलाशयांतील पाणी कमी झाल्याने ग्रामीण भागात टंचाईची स्थिती निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.

एकीकडे पाऊस दडी मारून बसला असताना आणि दुसरीकडे जलस्रोतांवरील वाढता ताण पाहता प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शेतकरी, नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून याबाबत नाराजी व्यक्त होत असून, या परिस्थितीस नेमके जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *