पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – सायबर चोरट्याने नागरिकाचा मोबाइल हॅक करून त्याच्या क्रेडिट कार्डवरून पाच लाख १४ हजार १३८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना ५ ते ६ मे २०२६ दरम्यान शिंदे वस्ती, रावेत येथे घडली.
याप्रकरणी रावेत येथील एका पुरुष फिर्यादीने अज्ञात चोरट्याच्या विरोधात सोमवारी (दि. २३ जून) रोजी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या व्हॉट्सॲपवर एम परिवहन नावाने वाहतूक चलनाबाबत एक एपीके फाईल आली होती. ती डाऊनलोड केल्यानंतर फिर्यादीला कोणतेही चलन दिसले नाही. परंतु, त्यानंतर आरोपीने त्यांचा मोबाइल हॅक करून एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून परस्पर पैसे काढून घेतले. रावेत पोलीस पुढील तपास करीत आहे.
मोबाइल हॅक करून पाच लाखांची फसवणूक
