पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोव्हेंबर २०२३ ते मे २०२६ दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची बनावट प्रत तयार करून ९ हेक्टर जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करत शासनाची फसवणूक करण्यात आली.
आरोपी मनीष वसंत वाकडे (रा. वारजे, पुणे), विनोद भिमाजी डफळ (रा. वडगाव बु.) व इतर ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सचिन छगनराव कोकाटे (वय ४९, रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे मोरवे येथील वर्ग २ ची जमीन सातबारा उघडण्यासाठी आरोपींनी उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी यांच्या आदेशाची बनावट प्रत तयार केली व दस्त नोंदणी करून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.
Pimpri-Chinchwad -बनावट शासकीय आदेश तयार करून ९ हेक्टर जमिनीबाबत शासनाची फसवणूक
