पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – चिंचवड येथील वाल्हेकरवाडीमध्ये २३ जून रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुलासोबत असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरून एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण केली.
सुनील मारुती लोणी (वय २५, रा. बिजली नगर, चिंचवड) व त्याच्या तीन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी सोपान रुपनर (वय ५२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील याने जुन्या वादातून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पत्नी व मुलालाही आरोपींनी मारहाण करून घरावर दगडफेक केली. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.
Pimpri-Chinchwad – जुन्या वादातून लोखंडी रॉडने मारहाण
