पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – मारुंजी येथील सार्वजनिक रस्त्यावर २३ जून रोजी सायंकाळी पावणेसात वाजता पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
विक्रांत विकास येवले (वय २२, रा. पाचाणे, ता. मावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई ओमप्रकाश श्रीरंग कांबळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे वस्ती ते जगताप चौक रस्त्यावर आरोपी ५१ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे बेकायदेशीरपणे बाळगताना रंगेहात पकडला गेला. त्याने पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग केला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
Pimpri-Chinchwad –हिंजवडीत पिस्तूल बाळगणारा तरुण जेरबंद
