वडिलांचे बनावट इच्छापत्र तयार करून न्यायालयाची फसवणूक

पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) – पिंपरी न्यायालयात मयत वडिलांचे बनावट इच्छापत्र सादर करून फसवणूक केली. ही घटना मोरवाडी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात येथे 26 सप्टेंबर 2020 ते 7 मे 2026 या कालावधीत घडली.
विजया विष्णु चाळके (वय 82), अविनाश विष्णु चाळके (वय 60, दोघेही रा. पुनावळे, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अजित विष्णु चाळके (वय 52, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी बुधवारी (दि. 24 जून) रोजी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादीचे मयत वडील विष्णु भाऊराव चाळके यांच्या नावाचे खोटे व बनावट इच्छापत्र न्यायालयात सादर केले. संत तुकारामनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *