पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – घर खरेदीचा व्यवहार करून १४ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना दि. १८ जुलै ते २० ऑक्टोबर २०२५ दरम्यान हनुमान नगर, धावडे वस्ती, भोसरी येथे घडली.
नरेश रामचंद्रराव बालकोंडेकर (वय ४२, रा. धावडे वस्ती, भोसरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रदीप गोपाल गुप्ता (वय ३७, रा. शिवगणेश नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीच्या मालकीच्या घराच्या व्यवहारापोटी एकूण २५ लाख रुपये ऑनलाइन आणि चेकद्वारे दिले होते व खरेदीखतही केले होते. उर्वरित रक्कम देण्यास तयार असताना आरोपीने व्यवहार रद्द केला. त्यापैकी ११ लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित १४ लाख रुपये मागितले असता आरोपी व त्याच्या पत्नीने पैसे न देता ‘तुला बघून घेऊ’ अशी धमकी दिली. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहे.
घर खरेदी व्यवहारात १४ लाख रुपयांची फसवणूक
