पुढील दोन दिवस राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले असून अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

येलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर यांचा समावेश आहे.

वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. शेतकरी, प्रवासी तसेच मोकळ्या जागेत काम करणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रिय असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *