गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी साठा करून ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी एका पान टपरीवर छापा टाकून एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. २६ जून) रात्री ११ वाजताच्या सुमारास रावेत ते वाल्हेकरवाडी कडे जाणारा जाधव घाट रोडवर पवार पान शॉप या टपरीमध्ये करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनायक सुभाष मराठे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय चिमाजी ढवळे (वय २८, रा. सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपीने आपल्या पान शॉपमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी साठा केला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्या टपरीमधून एकूण ८६ हजार ६०० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू, गुटखा आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. रावेत पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *