शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे कोयता जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २७ जून) रात्री १० वाजण्याच्या सुमारास एच. ए. ग्राउंड, नेहरूनगर, पिंपरी येथे करण्यात आली.
पोलीस कॉन्स्टेबल अनिल मोहिते यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित राजेश मिश्रा (वय २३, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी रोहित हा एच. ए. ग्राउंड परिसरामध्ये संशयास्पदरीत्या घुटमळत होता. पोलिसांना संशय आल्याने त्याची झडती घेतली असता, त्याच्या कब्जात ३०० रुपये किमतीचा एक कोयता बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याचे मिळून आले. पोलिसांनी शस्त्र जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले असून संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *