Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

उद्या मिळकतकरची १० टक्के सवलत मिळविण्याचा अखेरचा दिवस

By Sumedh Chapalgaonkar
June 29, 2026 2 Min Read
0

​पिंपरी-चिंचवड :
शहरातील मालमत्ताधारकांसाठी महापालिकेने जाहीर केलेल्या १० टक्के कर सवलतीचा लाभ घेण्याची उद्या (३० जून) अंतिम संधी आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करात ही आकर्षक सवलत दिली जात आहे. बुधवार, १ जुलैपासून मात्र ही सवलत बंद होणार असून, थकबाकीदारांविरोधात महापालिकेकडून थेट जप्तीची कडक मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उद्याच आपल्या कराचा भरणा करून या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

​शहरातील एकूण ७ लाख ४४ हजार मालमत्तांपैकी तब्बल ४ लाख १५ हजार नागरिकांनी आतापर्यंत ४८३ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर जमा केला आहे. विशेष म्हणजे, यातील ३ लाख ४६ हजार सुजाण नागरिकांनी ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडून या १० टक्के सवलतीचा थेट फायदा उठवला आहे. या योजनेला शहरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, उर्वरित नागरिकांनीही उद्या कार्यालयीन वेळेत किंवा ऑनलाईन पोर्टलवरून कर भरून सवलत मिळवावी, असे आवाहन कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

​१ जुलैपासून कारवाईचा बडगा!
​ज्या मालमत्ताधारकांनी वारंवार सांगूनही किंवा जप्तीच्या नोटिसा मिळूनही कर भरलेला नाही, अशा थकबाकीदारांवर १ जुलै २०२६ पासून मोठी कारवाई केली जाणार आहे. महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांना मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

​शहराच्या विकासासाठी कराचा भरणा करा!
​”शहराचा सर्वांगीण विकास हा नागरिकांच्या सहभागातूनच शक्य आहे. तुम्ही भरलेला प्रत्येक रुपया रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेसाठी वापरला जातो. त्यामुळे ३० जूनच्या अंतिम मुदतीपूर्वी सर्वांनी या १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा.”
— रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

​”महापालिकेच्या उत्पन्नातील प्रत्येक रुपया हा नागरिकांच्या सुख-सुविधांमध्ये गुंतवला जातो. ऑनलाईन कर भरणाऱ्यांना ३० जूनपर्यंत १० टक्के सवलत दिली आहे. या अंतिम संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, यानंतर महसूल वसुलीच्या नियोजनानुसार विशेष मोहीम राबविली जाईल.”
— डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

​”मालमत्ता करावरील १० टक्के सवलतीचा लाभ घेण्याची हीच ती शेवटची संधी आहे. नागरिकांनी उद्या ३० जूनपूर्वी आपला कर भरावा. १ जुलैपासून थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवून थेट जप्तीची कारवाई केली जाईल.”
— सचिन पवार, उपायुक्त, कर संकलन विभाग,

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठे बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी ११ ते १८ जुलैदरम्यान विविध मार्ग राहणार बंद; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Next

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे; १२ हजार पगाराच्या कर्मचाऱ्याने उभारले तब्बल २५ लाखांचे घर

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme