पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – काळेवाडी येथील एम एम चौक परिसरातील एका भोजनालयाचे मागच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोराने गल्ला आणि कपाटातून ६० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना दि. २९ जून रोजी रात्री १०:०० ते ३० जून रोजी सकाळी १०:३० च्या दरम्यान घडली.
हॉटेल व्यावसायिक अधिकराव विश्वासराव भोसले (वय ५३, रा. ज्योतीबा नगर, काळेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. शंकर सोपान सगर (वय १८, रा. थेरगाव याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शिवकल्याण भोजनालय’ या हॉटेलच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट व गल्ल्यातील एकूण ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.
काळेवाडीत घरफोडी प्रकरणी एकास अटक
